Breaking-newsराष्ट्रिय
कुलगाममध्ये स्फोट, एकाचा मृत्यू; दोघे जखमी
जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये स्फोट झाला आहे. कुलगामच्या चुडेर गावातील एक दुकानात हा स्फोट झाला. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलिस पोहचले असुन पुढील कारवाई सुरू आहे. जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जवानांकडून जशाप्रकारे कारवाई सुरू आहे, त्यामुळे दहशतवादी अधिकच चिडलेले आहेत. या अगोदर पुलवामामध्ये देखील हल्ला झाला होता.






