Breaking-newsराष्ट्रिय
काही निर्णय पक्षांतर्गत घेतले जातात – कुमारस्वामी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/HD-Kumaraswamy_-1-1.jpg)
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक मंत्रिमंडळातील एक मंत्री जी टी देवगौडा यांना उच्च शिक्षण खाते देण्यात आले आहे. देवगौडा आठवी पास आहेत आणि उच्च शिक्षण विभाग मिळाल्याबद्दल नाराज आहेत. माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांचा पराभव करणाऱ्या देवगौडांना एखादे महत्त्वाचे खाते पाहिजे होते.
एखाद्याला विशिष्ट खाते पाहिजे असते, परंतु काही निर्णय हे पक्षांतर्गत घेतले जातात. प्रत्येक खात्याचे काम प्रभावीपणे होणंए आवश्यक आहे. मी मुख्यमंत्री आहे, पण माझे शिक्षण काय झाले आहे? असा प्रश्न बी.एससी. असलेल्या कुमारस्वामींनी विचारला. प्रथम मंत्री बनण्याची आणि नंतर विशेष खात्याची मागणी करणे ही सामान्य बाब असल्याचे त्यांनी सांगितले.