breaking-newsराष्ट्रिय

काश्मीरच्या पूछ मधील बालाकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार, एक जवान शहीद

जम्मू – काश्मीरच्या पूछ मधील बालाकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला.

पाकिस्तानच्या जम्मू-काश्मीरमध्ये नापाक कारवाया सुरूच आहेत. पाकिस्तानकडून आज सकाळी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. भारतीय जवानांनीही पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या धुमश्चक्रीत भारताचा एक जवान शहीद झाला. याआधी दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानकडून उरी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button