इंधन दरवाढीवर पेट्रोलियम मंत्री प्रधान म्हणतात….
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/DharmendraPradhan-.jpg)
भुवनेश्वर : देशभरात दररोज वाढत असलेल्या पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतीने सर्वसामान्य नागरिक होरपळून गेले आहेत. त्यात आता पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या वक्तव्याने या चिंतेत अधिक भर पडली आहे. ओपेक (Organization of the Petroleum Exporting Countries- OPEC) देशांनी तेलाचे उत्पादन घेणे कमी केले आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत इंधनाचे भाव वाढले आहेत, असा दावा प्रधान यांनी केला आहे. दरम्यान, या सातत्याने होणाऱ्या भाववाढीवर भारत सरकार लवकरच पर्याय शोधेल, असा विश्वासही प्रधान यांनी व्यक्त केला आहे.
माध्यमांशी बोलताना प्रधान म्हणाले, इंधनाचे भाव वाढत आहेत. त्याचा फटका सर्वाधिक मध्यमवर्गीय नागरिकांना बसत आहे. पण, ही दरवाढ रोखणे सध्यातरी आमच्या हाती नाही. याशिवाय अमेरिका आणि इराण यांच्यातील न्युक्लिअर वादाचा फटका पेट्रोलियम पदार्थांना बसत असल्याचेही प्रधान म्हणाले