आडवाणी, किर्ती आझाद इत्यादी नेत्यांशी ममतांची चर्चा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/tmc-1.jpg)
नवी दिल्ली – दिल्लीच्या दौऱ्यावर आलेल्या तृणमुल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी संसदेत लालकृष्ण आडवाणी यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. आपली ही सौजन्य भेट होती असे त्यांनी म्हटले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 मिनीटे चर्चा झाली.
भाजपमधून निलंबीत करण्यात आलेले खासदार किर्ती आझाद यांनीही ममतांची भेट घेतली, त्यांच्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव ममतांना त्यांच्या पक्षाच्या संसदेतील कार्यालयामध्ये भेटले. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना किर्ती आझाद म्हणाले की ममता या सध्या विरोधी पक्षांमध्ये ऐक्य घडवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्यांचे हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.
अन्यही काही विरोधी पक्षाच्या नेत्यांशी तसेच एनडीए मधील घटक पक्षांच्याही नेत्यांशी त्या चर्चा करणार आहेत. पंतप्रधानपदासाठी उमेदवार जाहीर न करता सामुहिक नेतृत्वाच्या आधारे आम्ही लोकसभेच्या निवडणुकांसा सामोरे जाऊ आणि निडणुकीनंतर नेता निवड करू असे त्यांनी म्हटले आहे.