अमेरिका रशिया अथवा पुतीन यांच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही : निकी हॅले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/Nikki-Haley.jpg)
वाॅशिंग्टन: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाढत्या मैत्रीपूर्ण संबंधांवरून डोनाल्ड ट्रम्प टीकेचे लक्ष बनत आहेत. अमेरिकेकडून संयुक्त राष्ट्र संघाच्या राजदूत असलेल्या निकी हॅले आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या बचावास आल्या असून, अमेरिकेचा रशिया अथवा पुतीन यांच्यावर अजिबात विश्वास नसून, ट्रम्प आणि पुतीन यांची भेट मैत्रीपूर्वक संबंधातून नाही तर औपचारिकरीत्या घडून आल्याचे त्यांनी सांगितले.
ट्रम्प आणि पुतीन यांच्यादरम्यान ‘बंदिस्त’ खोलीत झालेल्या चर्चेला गुप्तहेर खात्याच्या अधिकाऱ्यांना प्रवेश न दिल्याने अमेरिकन मीडियामध्ये ट्रम्प यांच्यावर टीकेची झोड उठत असताना निकी यांनी मात्र यात काहीच गैर नसल्याचे सांगितले आहे. ट्रम्प यांची समोरा-समोर चर्चा करण्याची पद्धत असून याअगोदर देखील त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग व साऊथ कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्याशी एकट्यात चर्चा केल्याचा दाखला दिला.