breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Breaking News : पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती

पोटनिवडणुकीतील विजयानंतर पक्षश्रेष्ठींकडून मोठी जबाबदारी : आगामी निवडणुकांसाठी भाजपाचा ‘जगताप पॅटर्न’

 

पिंपरी :  विशेष प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक शंकर जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जगताप यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, भाजपाच्या शहराध्यक्षपदी शंकर जगताप हेच प्रमुख दावेदार राहतील, असे वृत्त ‘महाईन्यूज’ ने दिले होते. ते तंतोतंत खरे ठरले आहे. भाजपाचे विद्यमान शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा शहराध्यक्षपदाचा कार्यकाळ सहा महिन्यांपूर्वी संपला होता. तसेच,  शिरुर लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे नवीन शहराध्यक्ष कोण? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

राज्यातील पोटनिवडणूक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांमध्ये भाजपाची मोठी पिछेहाट सुरू असताना चिंचवडमध्ये केवळ ‘जगताप पॅटर्न’मुळेच पक्षाची पत राहिली. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी अचूक नियोजन करीत महाविकास आघाडीचे तगडे आव्हान रोखले. त्यामुळे या पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय सोपा झाला. त्यामुळे शंकर जगताप भाजपासाठी ‘संकटमोचक’ ठरले होते. त्याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनापूर्वी त्यांच्यावर सुमारे दोन वर्षे रुग्णालयात औषधोपचार सुरू होते. या काळात वैद्यकीय तज्ञांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतर जगताप यांना मतदार संघात बाहेर पडता आले नाही. या काळात भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांचे लहान बंधू उद्योजक शंकर जगताप यांच्या खांद्यावर चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर शंकर यांनी मतदार संघात मोर्चेबांधणी सुरू केली. दि. ३ जानेवारी २०२३ रोजी लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यावेळी कुटुंबाला सावरण्याची मोठी जबाबदारी शंकर जगताप यांच्यावर पडली होती. त्यांनी कुटुंब आणि पक्ष अशी दुहेरी जबबादारी यशस्वीपणे पेलली आणि पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांना विजय मिळला.

काय आहे ‘जगताप पॅटर्न’

दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी तब्बल २० वर्षे पिंपरी-चिंचवड शहरात आपल्या नेतृत्वाचा करिष्मा कायम ठेवला आहे. किंबहुना, भारतीय जनता पार्टीचा शहरातील सत्तेचा मार्ग सोपा करण्यात जगताप यांचा सिंहाचा वाटा आहे. महापालिकेतील सत्तेच्या पाच वर्षांच्या काळात जगताप यांनी अपवाद वगळता अनेक समर्थकांना महत्त्वाची पदे दिली आहेत. मतदार संघातील प्रत्येक गावामध्ये जगतापांचा कट्टर समर्थक आहेत. यासह राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय काही मान्यवर जगताप यांच्यासाठी अप्रत्यक्ष काम करीत असतात. केलेली विकासकामे आणि मतांची अचूक गोळाबेरीज याचा जगताप यांना कायम फायदा होतो. साम, दाम, दंड आणि भेद अशा सर्व आयुधांचा वापर करुन जगताप या मतदार संघाचे अनभिषिक्त सम्राट राहिले आहेत. त्यांच्याच तालमीत तयार झालेले शंकर जगताप आहेत. माजी नगरसेवक म्हणून त्यांनी पाच वर्षे सभागृहात कामकाज केले आहे. यासह अत्यंत शांत, संयमी आणि तितकेच अभ्यासू असलेले शंकर जगताप यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या यंत्रणेतील ‘बॅक बोन’ म्हणून त्यांचा मतदार संघातील बारीक-सारीक गोष्टींत अप्रत्यक्ष निर्णायक हस्तक्षेप असतो. हाच अनुभव शंकर जगताप यांच्या कामाला आला आणि निर्णायक मताधिक्य घेण्यात शंकर जगताप यशस्वी झाले. परिणामी, अश्विनी जगताप या ३६ हजारहून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत. आता भाजपा शहराध्यक्षपदाची संधी मिळाल्यामुळे पुन्हा एकदा ‘जगताप पॅटर्न’ पहायला मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button