breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमनोरंजनराजकारण

‘सरसेनापती हंबीरराव’हा मराठ्यांचा इतिहास कुटुंबासह अनुभवावा !

  •  प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेता प्रवीण तरडे यांचे आवाहन

  •  आमदार महेश लांडगे यांनी जपले इतिहासाभिमान अन् मित्रप्रेम

पिंपरी । प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनपटावर आधारीत ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट मराठ्यांचा इतिहास आहे. बारा बलुतेदार, सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र करुन छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. मराठ्यांना ‘मरहट्टे’ म्हणून ओळखले जाते. या चित्रपटासाठी आम्ही प्रामाणिक मेहनत घेतली आहे. हा आपला इतिहास कुटुंबासह अनुभवावा, असे आवाहन प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेता प्रवीण तरडे यांनी केले.

भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी चिंचवड येथील ‘कार्निवल’चित्रपटगृहात ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाच्या एका संपूर्ण शोचे बूकिंग केले होते. यावेळी चित्रपटाच्या टीमसोबत तरडे यांनी याठिकाणी भेट दिली.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, आपण हिंदी-इंग्रजीमधील अनेक सिनेमे आपण डोक्यावर घेतो. मात्र, आपल्या महाराष्ट्राशी संबंधित आपल्या गौरवशाली हिंदवी स्वराज्याशी संबंधित सिनेमांना आपण पहिली पसंती दिली पाहिजे. मराठ्यांच्या लढाया आणि रोमहर्षक जीवन अनुभवयल्यावर आपल्याला आभासी ‘ॲक्शन फिल्म’ची आवश्यकता वाटणार नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाने हा चित्रपट पहावा, आपल्या नात्यातील आणि मित्र परिवारातील सर्वांना हा चित्रपट आवर्जुन बघण्यास सांगावा, कारण आपला इतिहास आपल्याला समजला पाहिजे.

अभिनेता प्रवीण तरडे म्हणाले की, मराठीतील आतापर्यंतचा हा सर्वात बिग बजेट चित्रपट आहे. चित्रपटातील सरसेनापती हंबीरराव मोहीते यांची मुख्य भूमिका मी साकारली आहे. त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून आम्ही मेहनत घेत आहोत. चित्रपट रोमांचकारी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. चित्रपटाला महाराष्ट्रभर चांगला प्रतिसाद मिळत असून, तीन दिवसांत सुमारे ९ कोटी रुपयांचा व्यावसायक ला आहे. सर्वांनी हा चित्रपट चित्रपटगृहात येवूनच पहावा कारण त्याची भव्यता कोणत्या ॲपवर बघून कळणार नाही.

  • महेश लांडगेंनी दिलेला शब्द खरा केला…

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये दिग्दर्शक व अभिनेता प्रवीण तरडे यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी झाला होता. दिशा सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘सरसेनापती हंबीरराव’चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी झालेल्या या कार्यक्रमात आमदार लांडगे यांनी तरडेंना शब्द दिला होता. ‘‘मराठ्यांचा गौरवशाली इतिहास आणि ‘चांगला मामा कसा असावा?’हे सर्वांना कळले पाहिजे. यासाठी मी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एक शो बूक करुन लोकांना मोफत दाखवीन.’’ असे लांडगे यांनी जाहीरपणे सांगितले. तो शब्द करा करीत लांडगे यांनी शो- बूक करुन नातेवाईक व मित्र परिवारासोबत प्रवीण तरडे यांच्या उपस्थितीत चित्रपट पाहिला. याद्वारे आमदार लांडगे यांनी इतिहासाभिमान आणि मित्रप्रेमही जपले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button