breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
Breaking News : भारतात कोरोना व्हायरसचा शिरकाव; केरळमध्ये सापडला पहिला रुग्ण
नवी दिल्ली | संपूर्ण जगाला हादरवरून सोडणाऱ्या कोरोना व्हायरसने भारतात शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे. केरळमधील एका तरुणाला Coronavirus ची बाधा झाल्याचे समजते. हा तरुण चीनच्या वुहान विद्यापीठात शिक्षण घेत होता. यावेळी त्याला Coronavirus ची लागण झाल्याचा अंदाज आहे.
या विद्यार्थ्याची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.