breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

BREAKING NEWS | पुलवामामध्ये चकमकीत एका जवानाला वीरमरण तर अतिरेक्याचा खात्मा

पुलवामा | जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अतिरेकी आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे. पुलवामा जिल्ह्यातील कामाराजिपोरा येथे आज सकाळी सुरक्षा दलांने सफरचंदाच्या बागेत दोन अतिरेक्यांना घेरले. या चकमकीत आतापर्यंत एक दहशतवादी ठार झाला आहे. तर, चकमकीदरम्यान एक जवान शहीद झाल्याची बातमी येत आहे.

असे सांगितले जात आहे, या चकमकीदरम्यान एक जवान गंभीर जखमी झाला होता त्यांना तातडीने श्रीनगरच्या 92 बेस आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान हा जवान शहीद झाला. याशिवाय आणखी एक तरुण जखमी झाल्याची बातमी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या संपूर्ण भागात सर्च ऑपरेशन सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button