breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा : राज ठाकरे

मुंबई । प्रतिनिधी

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

तसेच, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेले वाहन सापडले आहे. राज्य सरकार याप्रकरणी चौकशी करणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी विनंतीही राज यांनी केली आहे.

परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. “गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला १०० कोटी रुपये मागितले, असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. मूळात ज्यांनी आरोप केले, ते परमबीर सिंग यांना एक वर्ष झालं आहे. लॉकडाउनमुळे त्यांना १२ कोटी देता आली नसेल, पण गृहमंत्र्यांने अशी गोष्ट सांगणं… गृहमंत्री राज्याचे असतात. राज्यात शहरं किती, त्यांना आयुक्तांना गृहमंत्र्यांनी काय सांगितलं हे अजून समोर आलेलं नाही. त्यामुळे देशमुख यांची कसून चौकशी होणं गरजेचं आहे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button