breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

BMC Election : राष्ट्रवादीकडून मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी, कार्यकर्त्यांना सूचना

मुंबई | महाईन्यूज | ऑनलाईन टीम

आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने तयारी सुरू केली आहे. पक्षाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन केलं आहे. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मार्गदर्शन केले जाणार आहे.

राष्ट्रवादी पक्षाची मुंबईतील ताकद कमी झाली होती. मात्र, आता सत्ता आल्यानंतर पुन्हा पक्ष वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबई अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी ‘मिशन-२०२२-मुंबई महापालिका’ या ध्येयपूर्तीच्या दृष्टीने आज सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सोमय्या मैदान, चुनाभट्टी, मुंबई येथे एक दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर होत आहे.

या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, राष्ट्रीय सरचिटणीस खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, विधी व न्याय मंत्री आदिती तटकरे हे उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांच्या भाषणाने शिबिराचा समारोप होणार असून या एनसीपी कार्यकर्ता शिबिराचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबई अध्यक्ष आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक करणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button