breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निरोगी आयुष्यासाठी तरुणाची पुणे ते बाणेर पायी यात्रा

  • जंगली महाराज मंदिर, दगडूशेठ गणपतीला घातले साकडे

पिंपरी प्रतिनिधी |

आमदार लक्ष्मण जगताप गेल्या आठ दिवसांपासून बाणेर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या त्यांच्याकडून उपचारांना प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे बोपखेल येथील एका तरूणाने आमदार जगताप यांनी गावासाठी केलेल्या कामाची आठवण ठेवत त्यांच्याप्रती अनोख्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली. जगताप यांना निरोगी आयुष्य लाभावे यासाठी जंगली महाराज मंदिर, श्री साई बाबा मंदिर शिवाजीनगर, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर,व अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज मठात प्रार्थना करत तेथून थेट बाणेर येथील हॉस्पिटलमध्ये येऊन पायी यात्रा पूर्ण केली.

चिंचवड विधान सभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर गेल्या आठ दिवसांपासून बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. त्यांना निरोगी आयुष्य लाभो व ते आजारातून लवकर मुक्त व्हावेत यासाठी त्यांच्या कामावर श्रद्धा व प्रेम करणारा बोपखेल गावातील सागर हनुमंत घुले या तरुणाने अनवाणी पायाने देवाकडे साकडे घालण्यासाठी वारी केली. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास वारी चालू केली त्याने बोपखेल ते जंगली महाराज मंदिर, श्री साई बाबा मंदिर शिवाजीनगर, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर,व अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज मठात प्रार्थना करत तेथून थेट बाणेर येथील हॉस्पिटलमध्ये येऊन पायी यात्रा पूर्ण केली. हॉस्पिटल बाणेर येथे येऊन हा पायी चालण्याचा प्रवास पूर्ण केला.

लक्ष्मण जगताप यांचा आणि माझा संपर्क तसा कधी आला नाही. परंतु लक्ष्मणभाऊंनी बोपखेल गाव चिंचवड विधानसभा मतदार संघात नसताना सुद्धा बोपखेल गावावर प्रेम केलं. बोपखेल गावाला हक्काचा रस्ता मिळवून देण्यासाठी संघर्ष केला.बोपखेल गावाला हक्काचा रस्ता मिळवून दिला. असे निःस्वार्थी प्रेम त्यांनी बोपखेल गावावर केलं. बोपखेल गाव त्यांचे हे प्रेम आम्ही कधीच विसरू शकत नाही. या संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला त्यांची खूप जास्त गरज आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button