breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

भाजपा आमदाराचा एमआयएमचे नेते ओवेसींकडून शपथ घेण्यास विरोध

Telangana Legislative Assembly : तेलंगणामध्ये काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता विधानसभेत आमदारांना शपथ देण्याचा सोहळा पार पडत आहे. अकबरूद्दीन ओवेसी यांना तेलंगणा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बनविण्यात आले आहे. मात्र भाजपाने यावर आक्षेप नोंदविला आहे. गोशामहलचे भाजपाचे आमदार टी. राजा सिंह यांनी आमदारपदाची शपथ घेण्यास विरोध दर्शवला आहे.

भाजपा आमदार टी. राजा सिंह म्हणाले, रेवंत रेड्डीदेखील आधीचे मुख्यमंत्री केसीआर यांच्याप्रमाणे एमआयएम पक्षाला घाबरत आहेत, त्यामुळेच त्यांनी ओवेसींना हंगामी अध्यक्ष म्हणून निवडले. नव्या सरकारचे नवे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचाही खरा चेहरा समोर आला. हे खूप दुर्दैवी आहे की. रेवंत रेड्डी म्हणत होते की, एमआयएम, भाजपा आणि बीआरएस एकत्र आहेत. आज कोण कोणासोबत आहे, हे जाहीर झाले.

हेही वाचा  –  केंद्र सरकारचा मोठा निर्णय! गॅस सिलिंडरवर मिळणार ६ लाखांचा विमा

अकबरुद्दीन ओवेसी यांनी १५ मिनिटांत १०० कोटी हिंदूंना मारण्याची भाषा वापरली होती. अशा नेत्याकडून मी शपथ घेणार नाही. आम्ही या शपथविधीवर बहिष्कार टाकत आहोत. पुढच्या काळात पूर्णवेळ अध्यक्ष नियुक्त झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे जाऊन शपथ घेऊ, असं टी.राजा सिंह म्हणाले.

हंगामी अध्यक्ष म्हणजे काय?

संविधानाच्या अनुच्छेद १८८ नुसार निवडून आलेल्या सदस्यांना हंगामी अध्यक्ष शपथ देतात. हंगामी अध्यक्ष हा सभागृहाचा अस्थायी अधिकारी असतो. नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणे आणि अधिकृत अध्यक्षाची निवड होईपर्यंत विधानसभेचे कामकाज पाहणे, एवढेच हंगामी अध्यक्षाचे काम आहे. ज्यावेळी अधिकृत अध्यक्ष निवडला जातो, तेव्हा हंगामी अध्यक्षाचे पद आपोआपच समाप्त होते. आज सकाळपासून अकबरूद्दीन ओवेसी आमदारांना शपथ देत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button