breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या तोंडून उर्फीचे कौतुक.!

माझं एवढंच म्हणनं आहे की कपडे घाल आणि फिर

पुणे : अभिनेत्री-मॉडेल उर्फी जावेदप्रकरण सध्या चांगलच तापलं आहे. चित्रा वाघ यांच्या पोलीस तक्रारीनंतर उर्फीला अंबोली पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीचे कौतुक केले आहे.
माझा विरोध हा कुठल्या महिलेला किंवा तिच्या धर्माला नव्हताच आणि नाही तो विरोध विकृतीला होता. पण आता तुम्ही कौतुक केलं पाहिजे कारण ती महिला आता पूर्ण कपड्यांमध्ये दिसते आहे. कोण सुधारत असेल तर त्याचे कौतुक पण केले पाहिजे, असं भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या.

तिने काही ठरवले असेल कारण ती आता चांगल्या कपड्यांमध्ये दिसतेय. मला अनेक जण फोटो पाठवत आहेत त्यामध्ये ती चांगली कपडे घालते आहे तिचं कौतुक केलं पाहिजे. माझं एवढंच म्हणनं आहे की बाई कपडे घाल आणि फिर, असं भाजपच्या नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या. चित्रा वाघ पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या.

सोबतच, महाराष्ट्र राज्य महिला आयोगास उर्फी जावेदने तक्रार अर्ज प्राप्त दिला आहे. यामध्ये मी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे, माझं राहणीमान आणि दिसणं व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक आहे , असे असतानाही त्याबाबत नाहक तक्रारी करून चित्रा वाघ यांनी केवळ स्वत: च्या राजकीय फायद्याकरिता किंवा त्यांचा प्रभाव असलेली व्यक्ती प्रसिद्धीकरिता मला मारहाण करण्याच्या धमक्या प्रसार माध्यमांद्वारे दिल्या आहेत. चित्रा वाघ यांचे राजकीय व्यक्तित्व असल्याने त्या किंवा त्यांचा प्रभाव असलेली व्यक्ती अथवा व्यक्ती समुहाकडून माझ्यावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे माझ्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. चित्रा वाघ यांच्या धमकीमुळे मला घराबाहेर पडतानाही भिती वाटत आहे, म्हणुन प्रकरणाची दाहकता निवळेपर्यंत सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी मागणी उर्फी जावेद हिने महिला आयोगाकडे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button