breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रियव्यापार

बिटकॉइनच्या दरात सलग सहाव्या दिवशी घसरण

 

नवी दिल्ली | टीम ऑनलाइन

आज बिटकॉइनच्या दरात सलग सहाव्या दिवशी घसरण झाली. बिटकॉइन आज 36,813 डॉलर म्हणजेच 29,11,025 रुपयांवर व्यवहार करत आहे. म्हणजेच बिटकॉइनची किंमत आज सहा टक्क्यांहून अधिक घसरली आहे.

बिटकॉइनची किंमत गेल्या आठवड्यात 40,000 डॉलरच्या खाली गेली. तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठं क्रिप्टोकरन्सी इथर 7.64 टक्क्यांनी घसरली आहे. सध्या इथरचा दर 2529 डॉलर इतका आहे. दरम्यान, तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात बिटकॉइनचा दर 30 हजार डॉलरपेक्षाही कमी होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये बिटकॉइनची 68 हजार डॉलर झाली आहे.

त्याचबरोबर आज भारतातील सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचे फ्युचर्स 0. 75 टक्क्यांनी वाढून सोन्याचा दर 50,454 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. तर, चांदीचा दर 1.13 टक्क्यांनी वाढून 64,426 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button