breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

मोठी बातमी : पुण्यात मनसेला धक्का;  रुपाली पाटील-ठोंबरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश ?

पुणे ।प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील आक्रमक नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वीही त्यांनी एका मुलाखतीत पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. मात्र, त्यांनी मनसे नेते अनिल शिदोरे यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची रुपाली पाटील ठोंबरे यांनी मुंबईत भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे नेते वरुन देसाई, राष्ट्रवादीचे अभय मांढरे उपस्थित होते. त्यामुळे रुपाली पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. मात्र, रुपाली पाटील यांनी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं कंबर कसली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेदेखील महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुढील दोन दिवस राज ठाकरे (Raj Thackeray) पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, राज ठाकरे पुण्यात येण्याआधीच रुपाली पाटील यांनी राजीनामा दिला आहे.

मनसेच्या रणरागिणी अशी रुपाली पाटील यांची ओळख होती. मात्र, मागील काही दिवसांत एका मुलाखतीत पक्ष सोडण्याबाबतचे संकेत दिले होते. मात्र, आज त्यांनी राजीनामा देत पक्षाला धक्का दिला आहे. रुपाली पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक पत्र लिहलं आहे. या पत्रात त्यांनी मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, असं नमूद केलं आहे.

रुपाली पाटील यांनी राजीनाम्यात काय म्हटलं?

रुपाली पाटील यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं, “सप्रेम जय महाराष्ट्र, मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत. यापुढेही आपले आशीर्वाद आणि मा.”श्री.राज ठाकरे” हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल. जय महाराष्ट्र.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button