breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

शादी डॉट कॉम…या मुलाला मुलगी शोधण्यासाठी मदत करा; नितेश राणेंचा सरदेसाईंना खोचक टोला

मुंबई |

भाजपाचे आमदार नितेश राणे आणि युवा सेनेचे नेते वरूण सरदेसाई यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहे. सचिन वाझे यांना अंबानी स्फोटकं प्रकरणात अटक झाल्यानंतर नितेश राणे यांनी वाझे आणि वरूण सरदेसाई यांच्या संबंध असल्याचा आरोप केला. त्या आरोपाला उत्तर देताना सरदेसाई यांनी राणे कुटुंबियांची पार्श्वभूमी सांगत टीका केली होती. तसेच आपण सुसंस्कृत घरातून असल्याचंही म्हटलं होतं. त्यानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सरदेसाई यांचा व्हिडीओ ट्विट करत लग्नासाठी पत्रकार परिषद घेतल्याचा टोला लगावला आहे.

सचिन वाझे आणि वरुण सरदेसाई यांचे संबंध होते. दोघांच्या मोबाईलवरील संभाषणाची एनआयएने चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्याला उत्तर देताना युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी स्वतःची शैक्षणिक व कौटुबिक पार्श्वभूमी सांगितली होती. त्यावरून आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत टोला लगावला आहे. “डियर शादी डॉट कॉम, हा तरुण लग्नासाठी मुलगी शोधत असल्याचं दिसत आहे. त्यामुळेच त्याने आपली व कुटुंबियांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की, त्याला मुलगी शोधण्यासाठी मदत करा,” असा टोला लगावला आहे.

ट्विटबरोबरच पत्रकार परिषदेतूनही राणे यांनी वरूण सरदेसाईंवर टीका केली होती. लग्नासाठी मुलगी शोधायची, तर शादी डॉट कॉमवर शोधायची, त्यासाठी पत्रकार परिषद घेण्याची काय गरज? असं राणे म्हणाले. “सचिन वाझे प्रकरणाबाबत सरदेसाईंनी अवाक्षरही काढलं नाही. मी बोललो ते खरं की खोटं, याबद्दलही ते काहीच बोलले नाहीत. मग पत्रकार परिषद फक्त सुक्या धमक्या देण्यासाठी घेतली होती का?,” असंही ते म्हणाले आहेत.

वाचा- सचिन वाझे प्रकरण! ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील त्यांच्यावर कारवाई होणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button