breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

माझ्यावर टीका केली तर मुंबईत येऊन तुझं कानफाड फोडीन; अभिजित बिचकुलेंचा गजानन काळेंना इशारा

राज ठाकरे हा माझा भाऊ आहे

माझी अवलाद कुणाची आहे ते तुला माहित नाही

मुंबई : मनसे नेते गजानन काळे यांनी आपल्या भाषणात संजय राऊत आणि अभिजित बिचकुले यांच्यावर टिका केली होती. यावरून आता अभिजुत बिचुकले यांनी गजानन काळे यांना कडक इशारा दिला आहे.

खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करणारा गजानन काळे हा नालायक माणूस आहे. तर राज ठाकरे हा माझा भाऊ आहे पण संजय राऊत आणि तुमचं वैर असेल पण मला का मध्ये ओढता? गजानन काळे तुझ्या 700 पिढ्यांना तरी माहिती आहे का? अभिजीत बिचुकलेची औकात काय आहे. यापुढे माझ्यावर टीका केली तर मुंबईत येऊन तुला फरपटत नेऊन राज ठाकरे यांच्या समोर तुझं कानफाड फोडीन, असा इशारा अभिजित बिचुकले यांनी मनसे नेते गजानन काळे यांना दिला आहे.

माझी अवलाद कुणाची आहे ते तुला माहित नाही अजून, शिवाजी महाराज यांचा वारसा आहे मी. लक्षात ठेव भाषा नीट वापर. संजय राऊत यांच्या चपलेजवळ उभी राहण्याची तुझी लायकी नाही. गांजा ओढून काढला का तुला? तुझ्या रक्तात गांजा आहे का? असे सवाल करत तुझा बाप आहे राज ठाकरे म्हणून उड्या मारू नको. तुझा काका इथे आहे. राज दादा अशा कार्यकर्त्यांना पक्षात ठेवू नका. माझ्याशी पंगा महागात पडेल. ज्या दिवशी राज दादा आणि आमचे एकमेकांचे काय होईल ते आमचे आम्ही पाहून घेऊ, असंही बिचुकले म्हणाले.

यापुर्वी, राज्यात दोनच माणसे अशी आहेत की त्यांना वाटते आपूनच भगवान है. ते म्हणजे संजय राऊत आणि अभिजित बिचुकले हे दोघेही गांजा ओढतात अशी टीका मनसे नेते गजानन काळे यांनी केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button