breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

२ हजारांच्या नोटा बदलण्यासाठी SBI चा मोठा निर्णय, गाईडलाईन्स केल्या जारी

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने २ हजार रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० सप्टेंबर पर्यंत सर्वांना बँकेत जाऊन नोटा बदलून घेता येणार आहे. २३ मे पासून २ हजार रूपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेता येणार आहे. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) २ हजार रूपयांच्या नोटा बदलण्यासंदर्भात महत्वाच्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

SBI च्या गाईडलाईन्सनुसार, २ हजार रूपयांच्या नोटा एकावेळी २० हजार रूपयांच्या मर्यादेपर्यंत बदलण्याची सुविधा असेल, यासाठी कोणताही फॉर्म किंवा स्लिप भरण्याची गरज नाही. यामुळे नागरिक एकाच वेळी २ हजार रूपयांच्या १० नोटा बदलून घेऊ शकतात.

हेही वाचा – ‘जगासाठी उत्कृष्ट शिक्षक घडवून भारताने विश्वगुरु व्हावे’; राज्यपाल रमेश बैस

तुम्ही SBI च्या शाखेत जाऊन कोणत्याही शाखेत जाऊन कोणताही फॉर्म न भरता किंवा ओळखपत्राशिवाय २ हजार रूपयांच्या नोटा सहज बदलून घेऊ शकता. २००० रूपयांच्या दहा नोटा बदलताना तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या ओळखपत्राची गरज भासणार नाही. म्हणजेच, नोटा बदलून घेताना ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही.

रिझर्व्ह बँकेची २ हजार रूपयांच्या नोटांसदर्भात घोषणा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १९ मे २०२३ रोजी २ हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यासंदर्भात घोषणा केली. पण त्या नोटा रद्द केल्यानंतरही त्या लीगल टेंडर असतील. आता २३ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत नागरिकांना २ हजारांच्या नोटा बदलून घेता येणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button