breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; एकमेव आमदार आलेमाव तृणमूलमध्ये दाखल

पणजी | टीम ऑनलाइन
 गोव्यातील ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला फार मोठा धक्का बसला आहे. राज्यातील पक्षाचे नेते आणि एकमेव आमदार चर्चिल आलेवाम यांनी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये विलीन केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अस्तित्व राज्यातील नेत्यांनीच संपविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच चर्चिल यांनी आपणास तृणमूल काँग्रेसचा आमदार म्हणून विधानसभेत जागा देण्याची विधानसभा अध्यक्षांकडे पत्राद्वारे परवानगी मागितली आहे.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच काँग्रेस पक्षासोबत सत्तेत सहभागी व्हायची. मात्र मागच्या दोन टर्ममध्ये काँग्रेस सत्तेपासून दूर राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सत्तेपासून दूर होता. मात्र बाणावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी मधल्या काळात भाजपाशी जुळवून घेतल्यामुळे नाराज काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने चर्चिल आलेमाव यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यातच आलेमाव आणि त्यांची कन्या वालांका आलेमाव या २०२२ला अनुक्रमे बाणवली आणि न्हवेलीम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे काँग्रेसने मागच्या वर्षभरापासून दूर ठेवल्यामुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तृणमूलमध्ये विलीन करून आगामी विधानसभा निवडणूक तृणमूलच्या झेंड्याखाली लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button