Uncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

जालन्यात मोठी कारवाई, स्टील व्यावसायिकांकडे सापडलं घबाड, ५८ कोटींच्या नोटा, ३२ किलो सोनं

जालना: राज्यातील सत्तांतरानंतर जालना जिल्ह्यात आयकर विभागाकडून  मोठा छापा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. १ ऑगस्टपासून जालन्यातील स्टील व्यावसायिकांवर हे छापे टाकायला सुरुवात झाली होती. या छापेमारीत एकूण ३९० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता हाती लागल्याची माहिती आहे. यामध्ये ५८ कोटी रुपयांची रोकड आणि ३२ किलो सोन्याचा समावेश आहे. प्राप्तीकर खात्याचे तब्बल २६० कर्मचारी या छापेमारीत सहभागी झाले होते. या छापेमारीदरम्यान मोठी रोकड जप्त करण्यात आली. ही रोकड मोजण्यासाठी आयकर विभागाने १२ मशिन्स वापरल्या. मात्र, इतक्या मशिन्स वापरुनही ही सर्व रोकड मोजण्यासाठी तब्बल १४ तासांचा अवधी लागला. यावरून मराठवाड्यातील ही कारवाई किती मोठी असेल, याचा अंदाज येऊ शकतो.

जालनासारख्या तुलनेने लहान जिल्ह्यातील व्यावसायिकांकडे इतक्या मोठ्याप्रमाणात बेहिशेबी संपत्ती सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जालन्याप्रमाणे औरंगाबादमधील व्यावसायिकांवरही अशाचप्रकारे छापे पडल्याची माहिती आहे. त्याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. परंतु, जालन्यातील आयकर विभागाच्या छापेमारीत सापडलेल्या संपत्तीचे आकडे हे चक्रावणारे आहेत. जालन्यातील स्टील व्यावसायिकांकडे रोकडे आणि सोन्याबरोबरच हिरे, मोती असा ऐवजही आढळून आला. आयकर विभागाचे कर्मचारी छापेमारीत जमा झालेली रोकड नजीकच्या एसबीआय बँकेत नेऊन मोजत होते. त्यामुळे बँकेच्या टेबलांवर ठिकठिकाणी नोटांच्या बंडलांची थप्पी रचलेली दिसत होती. इतके कर्मचारी आणि १२ मशिन्स दिमतीला असूनही ही सर्व रोकड मोजण्यासाठी तब्बल १४ तास लागले.आयकर खात्याच्या या छापेमारीची माहिती अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. १ ऑगस्ट रोजी हे छापासत्र राबवण्यास सुरुवात झाली, ८ ऑगस्टपर्यंत सुरु होते. या मोहीमेत एकूण २६० कर्मचारी दाखल झाले होते. इतक्या मोठ्याप्रमाणात आयकर खात्याचे कर्मचारी जिल्ह्यात दाखल झाल्याचा सुगावा कोणालाही लागू नये, यासाठी हे सर्वजण वेगवेगळ्या वाहनांतून याठिकाणी दाखल झाले होते. या कारवाईत जालना जिल्ह्यातील चार बड्या स्टील कारखानदारांची झडती घेण्यात आली. एकाचवेळी आयकर विभागाची विविध पथकं या स्टील उत्पादकांशी संबंधित असलेल्या मालमत्तांवर छापे टाकत होती. त्यावेळी आयकर खात्याच्या हाती मोठे घबाड लागले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button