breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी ३ दोषींना प्रत्येकी ६ वर्षांची शिक्षा

 

इंदुर | प्रतिनिधी 
हाय प्रोफाईल संत भय्यू महाराज आत्महत्याप्रकरणी इंदूर जिल्हा सत्र न्यायालयाने तिघांना दोषी ठरवून प्रत्येकी ६ वर्षांच्या कारावासाची शिक्षा आज सुनावली. पलक, शरद आणि विनायक अशी त्यांची नावे आहेत. हे तिघेही भय्यू महाराजांचे सेवेकरी आहेत. महाराजांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून ही शिक्षा ठोठावली.

१२ जून २०१८ रोजी भय्यू महाराज यांनी आपल्या परवानाधारक पिस्तुलातून डोक्यावर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली होती. सदर प्रकरणात पोलिसांनी तपास करून आत्महत्येला कारणीभूत असलेल्या भय्यू महाराजांच्या ३ सेवेकऱ्यांना अटक केली होती. या तिघांनी ब्लॅकमेल करून त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप भय्यू महाराजांच्या दुसऱ्या पत्नीने केला होता. त्यानुसार पोलिसांनी सेवेकरी विनायक, केअरटेकर पलक आणि वाहन चालक शरद यांना अटक केली होती.

या तिघांविरुद्ध सत्र न्यायालयात खटला सुरू होता. या प्रकरणात आरोपींच्या बाजूने एडवोकेट धर्मेंद्र गुर्जर यांनी युक्तीवाद केला. त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणी कोर्ट-४८ जिल्हा अप्पर न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांनी तिघांना दोषी ठरवून प्रत्येकी ६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. या तिघांनी भय्यू महाराज यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने त्यांना ही शिक्षा ठोठावली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button