ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूल मध्ये 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पिंपरी चिंचवड | इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूल, चिखली मध्ये 73 वा प्रजासत्ताक दिन ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्द्तीने उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील संचालिका श्रीमती कमला बिष्ट आणि शिक्षक व शिक्षकेत्तरवर्ग यांनी कोविड- 19 नियमांचे पालन करून ध्वजवंदन केले.देशाच्या संविधानाला ज्या व्यक्तीने जन्म दिला आणि ज्या व्यक्तीमुळे आज भारत देशाचा संपूर्ण कारभार चालतो अशी व्यक्ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या संचालिका श्रीमती कमला बिष्ट यांनी यानिमित्ताने करून दिली.

मुलांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व समजावे यासाठी ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या तिरंग्याच्या तीन रंगांचे महत्त्व सांगण्यात आले. केशरी रंग – केशरी रंग निस्वार्थ सेवा साहस शौर्य आणि अचाट देशभक्तीचे प्रतिक मानले जाते. पांढरा रंग – पांढरा रंग हा देशाच्या शुध्दतेचे, शांतीचे आणि मानवतेचे प्रतिक मानले जाते. हिरवा रंग – हिरवा रंग देशाच्या कृषी आणि धवल क्रांतीचे प्रतिक मानले जाते.

दरम्यान, शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ई-प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. यावेळी मुलांनी देशभक्तीपर गाणी, भाषण, कविता- ’26 जनवरी दिन गौरवशाली’ आदींचे धमाल सादरीकरण केले. शिक्षकांनी देशभक्तीपर नृत्य सादर करून मुलांच्या मनात देशाप्रती अभिमानाची भावना निर्माण केली.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दि. 23 डिसेंबर रोजी प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये झालेल्या तिसऱ्या वार्षिक स्नेहसंम्मेलन “यात्रा 2021-22” चे youtube लिंक (https://youtu.be/donkotbHMiE) वर सादरीकरण करण्यात आले.

वंदेमातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. देबोश्री भोंडवे, चंद्रकला कापरी, निशा पाटील, प्रीती साबने, अदिती एकवडे, प्रेमलता केंजळे, तन्वी नाशिकर, अनुराधा डिक्कर, रोहिणी भोसले, तमाळी डे, निरुपमा काकडे, संसिया लूद्राज, सुजाता शेलार, तेजश्री शिंदे , वैशाली खोत, सिद्धी सावंत, कल्यानी साजन, शोभना सिंग आणि पुष्कर कापरी आदी शिक्षिकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button