breaking-newsTOP Newsराजकारण

काँग्रेसला भगदाड, गुलाम नबी आझादांच्या पाठोपाठ ६४ बड्या नेत्यांचे सोनिया गांधीकडे संयुक्त राजीनामा पत्र सादर

श्रीनगर । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्याच्या धक्क्यातून सावरत असतानाच मंगळवारी पक्षाला आणखी एक हादरा बसला आहे. जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री तारा चंद यांच्यासह पक्षातील तब्बल ६४ नेत्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामध्ये ५० हून अधिक वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नेत्यांनी संयुक्त राजीनामा पत्र सादर केले, अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि गांधी घराण्याचे निकटवर्तीय गुलाम नबी आझाद यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. गांधी घराण्याशी असलेले जवळपास पाच दशकांचे ऋणानुबंद आझाद यांनी तोडले. यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावर सडकून टीका केली होती. आझाद लवकरच जम्मू-काश्मीरमधून राष्ट्रीय पातळीवरील पक्ष सुरु करणार आहेत.

माजी मंत्री-आमदारांचा काँग्रेसला रामराम
जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, माजी मंत्री अब्दुल मजीद वाणी, मनोहर लाल शर्मा, घारू राम आणि माजी आमदार बलवान सिंग यांच्यासह अनेकांनी पत्रकार परिषदेत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह राजीनामा जाहीर केला. आझाद यांच्या समर्थनार्थ आम्ही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना संयुक्त राजीनामा पत्र सादर केले आहे, असे बलवान सिंग यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button