TOP Newsताज्या घडामोडीपुणे

भररस्त्यात सुरू असलेल्या दाम्पत्यातील वाद मिटवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

भररस्त्यात सुरू असलेल्या दाम्पत्यातील वाद मिटवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली.या प्रकरणी वारजे पोलिसांनी गोविंद नागनाथ सुरवसे (वय ३५, रा. मुर्टा नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) याला अटक केली आहे. कर्वेनगर भागातील हिंगणे होम काॅलनीत भररस्त्यात गोविंद आणि त्याची पत्नी सायली यांच्यात वाद सुरू होते. याबाबतची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर वारजे पोलीस ठाण्यातील सागर जगताप आणि पोलीस शिपाई चव्हाण यांनी सुरवसे दाम्पत्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

गोेविंदला पोलीस समजावून सांगत होते. त्या वेळी गोविंदने पोलीस शिपाई चव्हाण आणि जगताप यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. गोविंदला पोलीस चौकीत नेण्यात येत असताना त्याने दुचाकीला लाथ मारली. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गोेविंद सुरवसेला अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button