breaking-newsTOP NewsUncategorizedगणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडीमुंबई

मुंबापुरीमध्ये बाप्पांच्या विसर्जनाला ‘भरतीचे विघ्न’; प्रशासकीय व्यवस्थेकडे लक्ष

टीम ऑनलाईन । महाईन्यूज । 

गणेशोत्सव आगमनाची चाहूल लागली असून अवघ्या काही दिवसांतच लाडक्या गणरायांचे आगमन होत आहे. गणेश चतुर्थीच्या तयारीत भाविकांसह मुंबई महापालिका, पोलिससांसह विविध यंत्रणा व्यग्र आहे. गणपतीच्या स्वागतासाठी बाजारपेठाही फुलून निघाल्या असून सर्वच भाविकांचे लक्ष गणेश आगमनाकडे लागले आहे. गणशोत्सवास सुरुवात होतानाच दीड ते अकरा दिवसांपर्यंत विसर्जनाच्या व्यवस्थेकडेही विशेष लक्ष देण्यास सुरुवात होते. मुंबई महापालिकेमार्फत विसर्जन व्यवस्थेची जबाबदारी हाताळली जातानाच त्या कालावधीतील ९ ते १३ सप्टेंबरपर्यंतच्या समुद्रातील उंच भरतीच्या लाटांच्या वेळांकडे लक्ष दिले जात आहे.

विसर्जनानिमित्त ९ ते १३ सप्टेंबर कालावधीतील समुद्रातील भरतीचे वेळापत्रक पाहिल्यास त्यात १० सप्टेंबर रोजी दुपारी ११ च्या सुमारास दुपारी ११.५५ वाजता ५.६८ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. मुंबईत घरगुतीप्रमाणेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचे दीड दिवसांपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंतच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात विसर्जन होते.

बृहन्मुंबई महापालिकेकडून या कालावधीत समुद्रकिनारी विसर्जनासाठी जाणाऱ्या भाविकांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सुविधेसाठी विविध सुविधा पुरविल्या जातात. समुद्रकिनाऱ्यांसह तलाव, कृमित्र तलाव आदी ठिकाणीही गणेश विसर्जनासाठी विशेष तयारी केली जाते. गणेश विसर्जनासाठी समुद्रकिनाऱ्यांकडे येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचणी येऊ नये म्हणून जीवरक्षकांसह निर्माल्य कलश, सामाजिक सेवा संस्थांच्या सहाय्याने गर्दी व्यवस्थापन आदी जबाबदारी पूर्ण केल्या जातात. त्याचवेळेस, समुद्रात भरतीच्या लाटांच्या वेळांही महत्त्वाच्या ठरतात. त्यासाठी भाविकांना मुंबई महापालिकेमार्फत समुद्रातील भरती, ओहोटीच्या वेळांच्या वेळापत्रकाचा उपयोग होईल .

कालावधी- भरतीच्या वेळा

शुक्रवार-९ सप्टेंबर-४.५२ मीटर-दु. ११.१६ वा.

शनिवार-१० सप्टेंबर-५.६८ मीटर-दु. ११.५५ वा.

रविवार-११ सप्टेंबर-४.७३ मी.-दु. १२.३१ वा.

सोमवार-१२ सप्टेंबर-४.६५ मी.-दु. १.०५ वा.

मंगळवार-१३ सप्टेंबर-४.५४ मी.-दु. १.३४ वा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button