breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपराजकारणराष्ट्रिय

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना मॉर्निंग वॉक करताना दुखापत; उपचारासाठी मुंबईत दाखल

नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना सोमवारी येथील सेमिनरी हिल परिसरात मॉर्निंग वॉक करताना दुखापत झाली. या दुखापतीत त्यांच्या खांद्याला मार लागला असून त्यात उजव्या हाताचे हाड मोडल्याचे समजते. येथील सरकारी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना पुढील अधिकच्या उपचारसाठी मुंबईत हलविले.

बाळासाहेब थोरात आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी सेमिनरी हिल परिसरात आले होते. त्यावेळी चालताना ते पाय घसरून पडले. यामध्ये त्यांच्या हाताचे हाड मोडले आहे. त्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे तातडीने दाखल करण्यात आले. तेथे सर्व तपासण्या झाल्यानंतर त्यांना मुंबईला हलवण्यात आले.

मेयोच्या आपत्कालीन विभागात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. तातडीने सिटी स्कॅन, एम.आर.आय.सह इतर तपासण्या केल्या गेल्या. त्यात उजव्या हाताचे हाड मोडल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर नातेवाईकांनी बाळासाहेब थोरात यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या परवानगीने मेयोतून सुटी घेऊन नागपूर विमानतळावर हलवण्यात आले दरम्यान, मेयो रुग्णालयात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री यशोमाती ठाकूर, आमदार प्रणिती शिंदे आदींनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button