breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिक्षण सभापतींच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग 23 मध्ये जनजागृती

  • सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पवार यांचा पुढाकार

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती सभापती मनीषा प्रमोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक २३ मध्ये कोरोना निर्बंध सप्ताह राबविण्यात आला. त्याअंतर्गत आज प्रभागमध्ये दोन हजार आरोग्य किटचे वाटप सभापती पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

थेरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर प्रभागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये प्रभागात मनीषा पवार व युवानेते प्रमोद पवार यांनी स्वतः झाडू हातात घेऊन आपल्या सहकाऱ्यांसमवेत साफसफाई केली. पवार यांनी आपल्या प्रभागातील दोन हजार नागरिकांना आरोग्य किटचे वाटप केले. तसेच, या कोरोना सारख्या महामारीची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, मास्क वापरावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, सामाजिक अंतर राखावे असे आवाहन त्यांनी केले.

कोरोना निर्बध सप्ताहात चालू आठवड्यात विविध उपक्रम राबिविण्यात आले. ७ जून रोजी ऑनलाइन लसीकरण नोंदणी करण्यात आली. ८ जून रोजी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. ९ जून रोजी प्रभागात कीटकनाशक औषध फवारणी करण्यात आली. १० जून रोजी गरजू नागरिकांना अन्नदान वाटप करण्यात आले. ११ जून रोजी क्वारंटाईन सेंटरला फळे वाटप करण्यात आली. तर, १२ जून रोजी भव्य रक्तदान शिबिर व कोरोना योद्धांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. आठवडाभर कोरोनामुळे निर्माण होत असलेल्या काळी बुरशी यावर मार्गदर्शन करण्यात आले. कोरोना समज-गैरसमज या विषयावर तज्ञांकडून माहितीपर कार्यक्रम घेण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button