breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

Euro Cup 2020 : स्लोवाकियाची पोलंडवर जोरदार मात

सेंट पीटर्सबर्ग – यूरो कप स्पर्धेत काल, सोमवारी ई गटातील सामन्यात पोलंड आणि स्लोवाकिया हे दोन संघ आमनेसामने आले होते. सेंट पीटर्सबर्गच्या क्रेस्टोव्स्की स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात स्लोवाकियाने पोलंडचा २-१ असा पराभव केला. या लढतीनंतर शेवटच्या आठ सामन्यात पोलंडला फक्त एकच विजय मिळवता आला आहे.

स्लोवाकियाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच पोलंडवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. पहिल्या १० मिनिटांच्या आत पोलंडला गोल करण्यासाठी अनेक संधी मिळाल्या, मात्र त्यांचे खेळाडू अपयशी ठरले. सामन्याच्या १३व्या मिनिटाला स्लोवाकियाने गोल करण्याची संधी चुकवली. परंतु रॉबर्ट माकने १८व्या मिनिटाला पोलंडच्या तीन बचावपटूंना भेदत स्लोवाकियासाठी पहिला गोल केला. त्यानंतर टॉमस हुबॉकॉला पहिले पिवळे कार्ड मिळाले. २१व्या मिनिटाला पोलंडच्या क्रिचिवीओकने स्लोवाकियाच्या खेळाडूला पाडल्यामुळे त्याला पिवळे कार्ड दाखवण्यात आले. पहिले सत्र संपेपर्यंत स्लोवाकियाचा संघ अधिक चपळ दिसून आला. पहिल्या सत्रात पोलंडने ७, तर स्लोवाकियाने ६ फाऊल केले.

त्यानंतर दुसऱ्या सत्रात पोलंडने पुनरागमन करत पहिला गोल केला. कारोल लिनेट्टीने ४६व्या मिनिटाला गोल करत स्लोवाकियाशी बरोबरी साधली. सामन्याच्या ६२व्या मिनिटाला क्रिचिवीओकच्या चुकीमुळे दुसरे पिवळे कार्ड दाखवण्यात आले. क्रिचिवीओक बाहेर गेल्याच्या सात मिनिटानंतर स्लोवाकियाने आपले आक्रमण वाढवत अजून एक गोल करत आघाडी घेतली. स्क्रिनियारने हा गोल नोंदवला. स्लोवाकियाने आपला बचाव आणि आक्रमण यांचे सुंदर मिश्रण करत ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. अतिरिक्त वेळेत पोलंडला बरोबरी साधण्याची संधी मिळाली होती, मात्र त्यांना गोल करण्यात अपयश आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button