breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

AUSW vs INDW : भारतीय महिलांची आजपासून कसोटी

क्वीन्सलँड – भारतीय आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट  संघामधील एकमेव डे-नाईट कसोटी सामना उद्यापासून (गुरुवार) क्वीन्सलँडमध्ये सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील तिसरी वन-डे जिंकल्याने टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे.

यामुळे यजमान ऑस्ट्रेलियाला मिताली ब्रिगेड कडवी टक्कर देण्यास सज्ज झाली आहे. मात्र, दुखापतीमुळे हरमनप्रीत सामन्यातून बाहेर पडल्याने याचा भारतीय फलंदाजीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.भारताने सात वर्षांनंतर पहिली टेस्ट खेळताना गेल्या जूनमध्ये इंग्लंडविरुद्धचा सामना अनिर्णीत राखला होता. मात्र, ऑस्ट्रेलियात आणि तेसुद्धा गुलाबी चेंडूने खेळणे भारतीय संघासाठी फारच आव्हानात्मक ठरणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 15 वर्षांपूर्वी म्हणजे 2006 मध्ये शेवटचा कसोटी सामना झाला होता. भारतीय संघातील मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांनाच कसोटीचा अनुभव आहे.

दरम्यान, कसोटीपूर्वीच यजमान ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. उपकर्णधार रशेल हेन्स ही स्नायू दुखापतीने कसोटीतून बाहेर पडली. यामुळे वन-डे मालिकेत शानदार कामगिरी करणार्‍या अन्नाबेल सदरलँडला संधी मिळू शकते.

प्रथमच खेळणार गुलाबी चेंडूने
भारतीय महिला संघ प्रथमच गुलाबी चेंडूने खेळणार आहे. या चेंडूने खेळण्याचा भारतीय महिलांना जराही अनुभव नाही. तर, ऑस्ट्रेलियाने डे- नाईट कसोटी सामना यापूर्वी नोव्हेंबर 2017 मध्ये खेळला होता. वन-डे मालिकेमुळे ऑस्ट्रेलियन संघालाही गुलाबी चेंडूवर सराव करण्यास जास्त वेळ मिळाला नाही. मात्र, हिरव्यागार खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज प्रभावी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आजपासून कसोटी (AUSW vs INDW)
स्थळ : कॅररा, क्वीन्सलँड
वेळ : सकाळी 10 वाजता.
प्रक्षेपण : सोनी नेटवर्क

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button