breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमहाराष्ट्र

नगर जिल्ह्यतील ६५० गावांत पुन्हा शाळा सुरू होणार

  • इ. ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी; मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

नगर |

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने करोनामुक्त झालेल्या गावांमध्ये इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग अटी व शर्ती लागू करत सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी पालकांच्या समितीने ग्रामपंचायतीचा ठराव करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यमध्ये सध्या (दि. २ जुलैपर्यंत) १ हजार ३१८ ग्रामपंचायतींपैकी ६५० तर १ हजार ५९६ गावांपैकी ८४५ गावे करोनामुक्त झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यतील ६५० ठिकाणच्या, तेथे इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग असल्यास ते सुरू होऊ शकतात.  शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या संदर्भातील आदेश आज, सोमवारी जारी केला आहे. विद्यार्थ्यांंचे गेल्या वर्षभरापासून शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळा सुरू केल्या जात असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वी शालेय शिक्षण विभागाने दि. १० नोव्हेंबर २०२० रोजी ९ डिसेंबर २०२० पासून अटी व शर्ती लागू करत शाळा सुरू, इयत्ता ८ ते १२ वीचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर दि. २७ जानेवारी २०२१ पासून इ.५ ते ८ वीचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु १५ एप्रिलपासून पुन्हा टाळेबंदी लागू करण्यात आल्याने शाळा, महाविद्यालये बंद झाली होती.

शालेय शिक्षण विभागाने दि. १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे जाहीर केले होते. आता नव्याने आदेश जारी करत टप्याटप्प्याने पुन्हा इयत्ता ८ ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी ज्या ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्था करोनामुक्त झाल्या आहेत त्यांनी पालकांच्या संमतीने वर्ग सुरू करण्याचा ठराव करणे बंधनकारक आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वर्ग सुरू केली जातील. त्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहेत.

त्यानुसार वर्ग आदलाबदलीच्या दिवशी सुरू ठेवून, सकाळ व दुपारच्या सत्रात सुरू करून, सध्या केवळ कोअर विषयांना प्राधान्य देऊन, एका बाकावर एक विद्यार्थी व दोन बाकांमध्ये किमान सहा फूट अंतर तसेच एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी बसतील, असे नियम लागू करण्यात आले आहेत. याशिवाय विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वारंवार हात धुणे, मुखपट्टीचा वापर करणे, लक्षणे आढळली तर त्या विद्यार्थ्यांला घरी पाठवून करोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या शिवाय शिक्षकांना त्याच गावात रहावे लागणार आहे. ते शक्य नसल्यास सार्वजनिक वाहनातून प्रवास करता येणार नाही.

शाळा र्निजतुकीकरणास सरकारने मदत द्यावी

शाळांना कोणतेही अनुदान मिळत नाही, करोनामुळे विद्यार्थ्यांंकडून शुल्क घेण्यासही मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे शाळा र्निजतुकीकरण करणे, परिसराची स्वच्छता ठेवणे, विद्यार्थी व शिक्षकांसाठी सॅनिटायझर उपलब्ध करणे, यासाठी राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांनी मदत करणे आवश्यक आहे. शाळा सुरू करण्यास आम्ही तयार आहोत. शिक्षकांना घरी बसून कंटाळाही आलेला आहे. गृहभेटी व मोबाइलवरील अध्यापनास मर्यादा पडतात.

—सुनील पंडित, जिल्हाध्यक्ष, मुख्याध्यापक संघ, नगर.

तालुकानिहाय आकडेवारी

करोनामुक्त झालेल्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे (कंसात करोनामुक्त गावांची संख्या) अकोले ३७ (७९) संगमनेर ७८ (१०१), कोपरगाव ५८ (६०), राहता ३२ (३२), श्रीरामपूर २७ (२९), राहुरी ४८ (५५), नेवासे ३० (३९), शेवगाव ५७ (७२), पाथर्डी ५६ (५९), जामखेड २८ (४७), कर्जत ४६ (७१), श्रीगोंदे ३४ (६६), पारनेर ३३ (४६), व नगर ८६ (८९).

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button