ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेवर वार करून दागिने पळवण्याचा प्रयत्न

पिंपरी चिंचवड | मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेवर चोरट्याने वार करून तिच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना 12 सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास ओमेगा सोसायटी, वाकड येथे घडली.रेखा ज्ञानेश्वर गिरमे (वय 66, रा. पोस्टल कॉलनी, वाकड) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. 22) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेखा गिरमे पहाटेच्या वेळी चालण्यासाठी गेल्या असताना अनोळखी चोरट्याने मागून येत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. रेखा यांनी चोरट्याला प्रतिकार केला असता चोरट्याने त्यांना मारहाण करून रस्त्यावरील वस्तूने मानेवर मारून जखमी केले. रेखा यांनी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button