breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

निर्बधांना झुगारून मिरजेत दुकाने उघडण्याचा प्रयत्न

सांगली |

तीन महिने होऊनही करोना प्रसार आटोक्यात येत नसल्याने लागू करण्यात आलेल्या निर्बधांना झुगारून सोमवारी मिरजेत व्यापाऱ्यानी दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकाने सुरू केल्यानंतर गर्दी झाल्याने पुन्हा पोलीस व महापालिका प्रशासनाने पुन्हा दुकाने बंद करण्यास भाग पाडले. गेले तीन महिने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने सुरू ठेवण्यास प्रशासनाने मनाई केली आहे. रविवारी पुन्हा चौथ्या टप्प्यातील निर्बधानुसार अत्यावश्यक सेवा दुकारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून अन्य सेवा, व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली. याबाबत रविवारी झालेल्या बठकीमध्ये मी मिरजकर फौंडेशनच्यावतीने दुकानदारांना दुकाने सुरू करण्यास साथ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

आज सकाळी मी मिरजकर फाउंडेशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील कापड दुकाने, विद्युत साहित्याची दुकाने मोबाईल शॉपी, लक्ष्मी मार्केट इमारतीच्या दक्षिण बाजूस असलेली भांडी दुकाने खुली करण्यात आली. या वेळी मी मिरजकर फौंडेशनचे सुधाकर खाडे, शीतल पाटोळे आदी कार्यकत्रे रस्त्यावर उतरले होते. कार्यकत्रे जोपर्यंत रस्त्यावर होते तोपर्यंत महापालिका कर्मचाऱ्यांचे पथकही शांत होते. कापड दुकाने सुरू होताच ईदनिमित्त खरेदी करण्यासाठी या मार्गावर गर्दी होऊ लागली. तोपर्यंत कार्यकत्रेही पांगले होते. या दरम्यान, पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यानी दुकानदारांना दुकाने बंद करा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला. महापालिकेच्या पथकाने चित्रीकरण सुरू करताच सुरू झालेली दुकाने पुन्हा बंद करण्यात आली. लोणी बाजारातही या दरम्यान भाजी विक्रेत्यांनी ठाण मांडले होते. भाजीपाला जप्त करणाऱ्या महापालिका पथकाशी विक्रेत्यांची वादावादीही झाली.

दरम्यान, गेली तीन महिने निर्बंध लादूनही काही ठिकाणी रुग्ण संख्या आटोक्यात येत नाही. यामुळे व्यावसायिकामध्ये रोष निर्माण झाला असून सोमवारी जत शहरातही व्यापाऱ्यांनी आंदोलन केले. व्यापारी वर्गात निर्माण झालेल्या असंतोषाची दखल घेण्यात आली असून कमी रुग्ण संख्या असलेल्या ठिकाणी व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्याबाबत प्रशासनाने पर्याय सुचवावा, असे आवाहन राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केले आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनीही याबाबत मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी चर्चा करून तातडीने निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. २५ हून अधिक रुग्णसंख्या असलेली १७४ गावे वगळून अन्य ठिकाणी करोना नियमांचे पालन करून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button