breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार ; एक भारतीय ठार
श्रीनगर : पाकिस्तानने आज पुन्हा एकदा भारतीय सीमारेषेवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला आहे. जम्मू-काश्मीरमधील कठुआ शहरात झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. भारतीय जवानांकडून या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. या गोळीबारामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, पाकिस्तानकडून अखनूर ते सांबापर्यंतच्या सर्वच ठिकाणी गोळीबार केला जात आहे. जम्मूचे पोलीस महानिरीक्षक एस डी सिंग जमवाल यांनी अरनिया सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाल्याचे सांगितले. सध्या दोन्ही बाजूने गोळीबार सुरू आहे.