breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

अतिकने १९ वर्षांपूर्वीच केली होती मृत्यूची भविष्यवाणी

दिल्ली : उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची पोलिसांच्या समोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्या संपुर्ण घटनेने देशात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आपला मृत्यूची भविष्यवाणी अतिकने १९ वर्षांपूर्वीच केली होती. २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्याने पत्रकाराशी संवाद साधताना आपला मृत्यू कसा होणार?, हे सांगितलं होतं.

अतीक अहमदने २००४ मध्ये फुलपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली होती. त्यावेळी तो अनेकदा स्थानिक पत्रकारांशी अनौपचारिक बैठका घेत असत. अशाच एका भेटीत त्याने आपल्या हत्येची भीती व्यक्त केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, माझा पोलीस एनकाउंटर करतील किंवा माझ्यासारखाच कुणीतरी मला ठार करेल आणि मी रस्त्याच्या कडेला निपचीत पडलेला असेल, असे तो १९ वर्षांपूर्वी म्हणाला होता.

प्रयागराजमध्ये अतिकची तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्याच्या काही क्षणापूर्वी पत्रकारांनी अतिकला विचारले की, त्याला मुलगा असद अहमद याच्या अंतिम यात्रेला का नेण्यात आले नाही? यावेळी त्याने पोलिसांनी अत्यंविधीला नेले नाही, असे म्हणाला. तेवढ्यात तिघांना त्याच्यावर बेछुट गोळीबार केला. अतिक आणि अशरफवर हल्लेखोरांनी १६-१७ गोळ्या झाडल्या. या घटनेत त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button