पिंपरी l प्रतिनिधी
हिंजवडी येथील कस्तुरी चौकात हिंजवडी पोलिसांनी तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 14 हजार 760 रुपये किमतीचा प्रतिबंधित माल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 19) रात्री पावणे दहा वाजता केली.
अर्जुन नारायण मंडल (वय 24, रा. हिंजवडी), वैभव प्रल्हाद वारडे (वय 35, रा. आकुर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई अमित जगताप यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री हिंजवडी पोलिसांना माहिती मिळाली कि, कस्तुरी चौक हिंजवडी येथील ठेका हॉटेल येथे दोघेजण तंबाखूजन्य पदार्थ विक्री करीत आहेत. त्यानुसार पोलिसांनी ठेका हॉटेलवर गुरुवारी रात्री छापा मारून कारवाई केली. पोलिसांनी हॉटेल चालक मालक वैभव आणि हुक्का बनवणारा अर्जुन या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 14 हजार 760 रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला आहे. दोन्ही आरोपींना सीआरपीसी 41 (1) (अ) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.