breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

स्मार्ट टीव्ही व्यवसायाची वयाच्या 24 व्या वर्षी केली सुरुवात, आज भारतातील सर्वात श्रीमंत सेल्फमेड महिला आहे

आयआयएफएल वेल्थ आणि हुरुन इंडियाने अलीकडेच 40 आणि त्यापेक्षा कमी वयाच्या सेल्फ मेड श्रीमंतांची यादी जाहीर केली. या यादीतील एकमेव महिला 39 वर्षीय देविता सराफ आहे. या यादीत त्या 16 व्या स्थानावर आहेत. देविता व्हीयू ग्रुपच्या सीईओ आणि अध्यक्ष आहेत. फॉर्च्युन इंडिया (2019) च्या 50 सर्वाधिक पॉवरफुल वुमन महिलांमध्येही त्यांचे नाव आले आहे. 2018 मध्ये भारत जगातील सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये देविता सराफ यांचा क्रमांक लागतो. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 1200 कोटी आहे.

देविता सराफ यांनी हार्वर्ड यूनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले आहे. त्या जेनिथ कंप्यूटरचे मालक राजकुमार सराफ यांची मुलगी आहेत. त्यांना नेहमीच काहीना काही वेगळे करायचे होते. यामुळे फॅमिली बिझनेस सांभाळला नाही. 2006 मध्ये जेव्हा टेक्नोलॉजीमध्ये झपाट्याने बदल होत होते आणि अमेरिकेत गूगल आणि अॅपलसारख्या कंपन्या मोबाइल आणि कम्प्यूटरमध्ये गॅप संपवण्याच्या प्रयत्नात होती, तेव्हा देविता यांनी काही तरी नवीन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी टीव्ही व्यवसायाची निवड केली. त्यांनी VU टीव्हीची सुरुवात केली. जी टीव्ही सीपीयूचे मिश्रित रुप होते.

त्यांची कंपनी लेटेस्ट तंत्रज्ञानात चांगले काम करत आहे. देविता यांची कंपनी अडवान्स TV बनवते. या टीव्हीवर यू-ट्यूब आणि हॉट स्टारसारखे अॅपही सहज चालवले जातात. म्हणजेच ही टीव्ही कम कम्प्यूटर असते. या माध्यमातून तुम्ही मल्टी टास्किंग करु शकता. यासोबतच कंपनी एंड्रॉयडवर चालणाऱ्या डाय डेफिनेशन टीव्हीही बनवते. मोठ्या स्क्रीनसोबत कंपनीजवळ कॉरपोरेट यूजची टीव्ही देखील आहे.

देविता यांनी कंपनी सुरू केली होती तेव्हा त्यांचे वय अवघे 24 वर्षे होते. सुरुवातीला त्यांना अनेक अडचणी आल्या, मात्र जवळपास 6 वर्षांनंतर 2012 मध्ये त्यांची कंपनी प्रॉफिटमध्ये आली. 2017 मध्ये कंपनीचा टर्नओवर जवळपास 540 कोटींपर्यंत पोहोचला होता. यानंतरपासून सतत वाढत गेला. आज देविता यांच्याजवळ संपूर्ण भारतात जवळपास 10 लाखांपेक्षा जास्त कस्टमर्स आहेत. कंपनी जगातील 60 देशांमध्ये आपली टीव्ही विकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button