TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

आशिष शेलारांची घोषणा, महाविकास आघाडी नेत्यांविरोधात भाजपचे उद्या माफी मांगो आंदोलन

मुंबई ः महापुरुषांचा अपमान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, बेरोजगार, महागाईसह अनेक प्रश्नांना घेऊन महाविकास आघाडी आणि मित्र पक्ष 17 डिसेंबरला मुंबई विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चावरून बरे राजकारण रंगतेय. अशात सत्ताधारी भाजप शिंदे सरकारचे नेतेही मविआच्या मोर्चावर सडकून टीका करत आहेत. अशात मविआच्या मोर्चाला शह देण्यास आता भाजपने मविआ नेत्यांविरोधात उद्या माफी मांगो आंदोलनाची घोषणा केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळावरून आणि सुषमा अंधारेंनी हिंदू देवीदेवतांविषयी केलेल्या विधानांच्या निषेधार्थ भाजप उद्या मुंबईतील सहाही लोकसभा मतदार संघात हे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे, अजित पवार, सुषमा अंधारे, नाना पटोले यांच्याकडून माफीची मागणी केली जाणार आहे. पूर्ण मुंबईभर हे आंदोलन होणार आहे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत याविषयी माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी मविआ नेत्यावर सडकून टीका केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळावरून निर्माण केलेला वाद या सगळ्याविरोधात उद्या मुंबईभर भाजप माफी मांगो निदर्शनं करणार आहे. मविआला मोर्चे काढण्याचा अधिकारचं नाही कारण मोर्चा ज्याबाबतीत काढला जात आहे, त्या बाबतचं असत्यता पसरवली जात आहे, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

उद्धवजी वारकऱ्यांचा अपमान हा महाराष्ट्र द्रोह नाही का? हिंदू देवीदेवतांचा अपमान करण हिंदू मानला इजा पोहचली जाईल अशी वक्तवे समाजमाध्यमांवर आल्यानंतर उद्धव ठाकरे मौन सोडण्यास तयार नाहीत. कसे डोंबलाचे मोर्चे करता उद्या… समाजात भारतीय मनात असंतोष आहे. तो असंतोष प्रभु रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण वारकरी संप्रदाय, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथजी या सगळ्यांवरती केलेल्या चेष्ठा, खिल्ल्या, टिपण्ण्या, अलोचना, भंकस हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सहन कस होत आहे, पण महाराष्ट्र हे सहन करु शकत नाही, त्यामुळे मुंबई भाजपने ठरवलं आहे की, महापुरुषांचा अपमान हे विशेषत; महाविकास आघाडी आणि शिवसेनेकडून सुरु आहे. हिंदू देवीदेवतांची जितकी टिंगल टावळी करता येईल, काय म्हणे भगवान श्री कृष्ण डेटला गेले होते. डेट करत होते हे शिवसेनेच्या उपनेत्याचं ज्ञान, कुठली ही संस्कृती, हिंमत कशी होते. त्यामुळे हिंदू देवीदेवतांचा अपमान हा वारकरी संप्रदायावर केलेला हल्ला आहे, हा महाराष्ट्र द्रोह आहे, अशी संपप्त प्रतिक्रिया शेलारांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button