breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. राजेंद्र कांकरीया

पिंपरी – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी प्रतिभा शैक्षणिक संकुलाचे मानद प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया यांची तर, मुख्य सल्लागारपदी डॉ.दीपक शहा यांची निवड करण्यात आली. ही निवड ३ वर्षांसाठी आहे.
ऑनलाईन झालेल्या या बैठकीस पुणे, पिंपरी, चिंचवड,निगडी, चाकण, राजगुरूनगर, बारामती, आर्वी, भोर, शिरूर, इंदापूर शाखेतील ४७ कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात सर्वानुमते जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यात उपाध्यक्ष – बाळकृष्ण भापकर (बारामती), कार्याध्यक्ष – श्रीराम नलावडे (पिंपरी – चिंचवड), प्रधान सचिव – नारायण कर्पे (चाकण), कार्यवाह (युवा विभाग) – सुजित चव्हाण (भोर), वार्तापत्र विभाग – सुभाष सोळंकी (पिंपरी – चिंचवड), वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प – भारत विठ्ठलदास (इंदापूर), बुवाबाजी संघर्ष – भगवान काळभोर, सांस्कृतिक विभाग – नामदेव पडदुणे (चाकण), महिला विभाग – पार्वती कदम (तळेगाव ढमढेरे), मानसिक आरोग्य विभाग – अनुराधा काळे (पुणे), विविध उपक्रम विभाग – सुरेश सपकाळ (पुणे), कायदा विभाग – अ‍ॅड. श्रीकांत ठाकूर (पुणे), जातीअंत विभाग / जोडीदाराची विवेकी निवड – राजु जाधव (पिंपरी – चिंचवड), प्रशिक्षण विभाग – डॉ. हेमंत चिखलीकर, सोशल मीडिया विभाग – कृतार्थ शेवगावकर (पुणे), जिल्हा सल्लागार समिती – रघुवीर तुपे (हडपसर), दिनकर साळुंखे (पिंपरी – चिंचवड), राज्य सल्लागार सदस्य – डॉ. अरुण बुरांडे, विश्वास पेंडसे, राज्य कार्यकारणी सदस्य – मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, विविध उपक्रम – धनंजय कोठावळे (भोर), सांस्कृतिक विभाग (राज्य सदस्य) – मनोहर शेवकरी (चाकण), कायदे विभाग (राज्य सदस्य) – अ‍ॅड. साधना बाजारे, वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प (राज्य सदस्य) – राहुल माने यांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button