breaking-newsक्रिडा

जागतिक स्क्वॉश स्पर्धा : जोश्नाची विजयी सलामी

कैरो : भारताची आघाडीची स्क्वॉशपटू जोश्ना चिनप्पाला शुक्रवारी महिलांच्या जागतिक अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेतील पहिल्या फेरीत संघर्षपूर्ण विजय मिळाला. इजिप्तमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत १२व्या मानांकित जोश्नाने अमेरिकेच्या बिगरमानांकित हॅली मेन्डेझला ९-११, १२-१०, ८-११, ११-६, ११-६ असे पाच सेटमध्ये नमवले.

भारताच्या सुनन्या कुरुव्हिलाला मात्र पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला. बेल्जियमच्या नील गिल्सने सुनन्याला ८-११, ११-७, ११-४, ११-५ असे चार गेममध्ये पराभूत केले.

याव्यतिरिक्त येथेच सुरू असलेल्या पुरुषांच्या इजिप्शियन खुल्या स्क्वॉश स्पर्धेत भारताच्या सौरव घोषालला प्रतिस्पर्धीने दुखापतीमुळे माघार घेतल्याने दुसऱ्या फेरीत चाल देण्यात आली, तर रमित टंडनला हाँगकाँगच्या लिओ ओऊने ११-५, ११-७, ११-२ अशी धूळ चारून त्याचे आव्हान संपुष्टात आणले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button