breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्राने कधीही कोरोनाची आकडेवारी लपवली नाही, त्यामुळे…- राजेश टोपे

मुंबई – महाराष्ट्राने  कधीही कोरोनाची आकडेवारी लपवली नाही. त्यामुळे राज्याने देशपातळीवर उत्तम काम केल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. तसेच म्युकरमायकोसीस हा आजार आगामी काळात नोटीफाईड डिसीज ठरणार असल्याचा इशारा राजेश टोपे यांनी प्रशासनाला दिलाय.

आहे. कोरोना टेस्टिंग हाय आणि लो रिस्कमध्येच वाढवली पाहिजे. टेस्टींग कुठे केल्या जातात हेही महत्त्वाचे आहे. लवकर निदान झाल्यामुळे उपचार लवकर मिळून मृत्यूदर कमी होण्यास मदत हाते. त्याचबरोबर ग्रामीण आणि तालुकास्तरीय उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आयसीयू बेडची गरज आहे. शासन आगामी काळात त्यासाठी प्रयत्नशील आहे, असं राजेश टोपे म्हणाले.

खासगी रुग्णलयांत होणारी फसवणूक टाळण्यासाठी ऑडीटर नेमण्यासाठी जिल्हाप्रशासनाने पावले उचलावीत. गृह विलगीकरणाचे प्रमाण कमी करण्यावर जिल्हा प्रशासनाने भर द्यावा, सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी डॅशबोर्ड अद्ययावत ठेवावा, असंही टोपे यांनी सांगितलं.

दरम्यान, देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळत असलं तरी रुग्णवाढ आणि मृत्यूचं प्रमाण चिंताजनक आहे. त्यातच म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराने देशासह राज्यात शिरकाव केलाय. यामुळे चिंतेत वाढ झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button