पिंपरी / चिंचवड

शिरगाव मधील दरोड्याच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराला अटक

खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

पिंपरी l प्रतिनिधी

शिरगाव पोलीस चौकीत दाखल असलेल्या सशस्त्र दरोड्याच्या गुन्ह्यातील सराईत आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. आरोपी हा हिंजवडी पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहे.

विशाल वसुदेव सोनवणे (वय 22, रा. कासारसाई, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव चौकीत दाखल असलेल्या एका दरोड्याच्या गुन्ह्यातील कासारसाई धरणाजवळ आला असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस नाईक आशिष बोटके यांना मिळाली. त्यानुसार बुधवारी (दि. 20) कासारसाई धरणाजवळ सापळा लावून विशाल सोनवणे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने शिरगाव पोलीस चौकीच्या हद्दीत सशस्त्र दरोड्याच्या गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याची अधिक चौकशी केली असता आरोपी विशाल हा हिंजवडी पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. पुढील कारवाईसाठी त्याला शिरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शाकिर जीनेडी, सहाय्यक फौजदार दुधावने, पोलीस हवालदार मावसकर, किरण काटकर, पोलीस नाईक आशिष बोटके, नलगे, मगर यांच्या पथकाने केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button