breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मोठी बातमी! सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासोबत ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, जयंत पाटील यांना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करत सुनिल तटकरे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. याबाबतची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, अजित पवार यांच्याकडून संघटनात्मक बदल सुरु केले आहेत. संघटनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त कऱण्यात येत आहे. सुनील तटकरे नवीन प्रदेशाध्यक्ष असतील. पक्षाच्या पुढील नियुक्तीचे संपूर्ण अधिकार सुनील तटकरे यांच्याकडे राहतील. तसेच अजित पवार यांची गटनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतोदपदी अनिल पाटील कायम राहतील. पक्षाकडून कुणाचीही हकालपट्टी होऊ शकत नाही.

हेही वाचा – Shiv Thackeray : मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे जखमी, हाताला गंभीर दुखापत

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदी रूपाली चाकणकर यांची निवड तर अमोल मिटकरी यांची प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे, असं सुनील तटकरे म्हणाले.

पक्ष आणि चिन्ह आमच्यासोबत – अजित पवार 

विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेते म्हणून निवडतात. ज्याचे संख्याबळ जास्त त्यामधून विरोधी पक्षनेते निवड करतात. बहुतेक आमदार आमच्यासोबत आहोंत. त्यांच्यात संभ्रम निर्माण होण्यासाठी अशी निवड केली आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत. पक्ष आणि चिन्ह आमच्यासोबत आहेत. आमच्यासोबत जे आमदार आहेत त्यांना घटनेची, कायद्याची अडचण येणार नाही याची काळजी घेऊ, असे अजित पवार म्हणाले .

दरम्यान, खासदार सुनिल तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल या दोन खासदारांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर आता कारवाई करण्यात आली आहे. या दोघांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, असा आदेश पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button