breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

Apple ने लाँच केली आपली स्वस्त स्मार्टवॉच

नवी दिल्ली – Apple ने लाँचिंग इव्हेंटमध्ये आपली स्वस्त किंमतीची वॉच लाँच केली आहे. करोना व्हायरस संसर्ग सध्या सुरू असल्याने यावर्षी आपला कार्यक्रम ऑनलाइन केला आहे. कंपनीचे सीईओ टीम कुक (Tim Cook) ने अॅपलच्या हेडक्वॉर्टर अॅपल पार्कमध्ये या व्हर्च्यूअल प्रेस कॉन्फ्रेन्स मध्ये ही वॉच लाँचिंग केली. कंपनी अॅपल वॉच आणि आयपॅडवर फोकस करीत असल्याची माहिती कुक यांनी सुरुवातीलाच दिली. आयफोन १२ ला कंपनी दुसऱ्या इव्हेंटमध्ये लाँच करणार आहे.

अॅपल वॉच सीरीज ६ झाली लाँच
अॅपल इव्हेंटमध्ये कंपनीने Apple Watch Series 6 लाँच केली आहे. अॅपलची ही वॉच ब्लड ऑक्सिजन लेवल मोजू शकते. ऑक्सिजन लेवलवरून माहिती होते की, तुमचे कार्डियोवेस्कुलर सिस्टम व्यवस्थितीत काम करतेय की नाही. म्हणजेच जर तुम्ही अॅपल वॉच सीरीज ६ चा वापर करीत असाल तर तुम्हाला वेगळे ऑक्सीमिटर वापरण्याची गरज पडत नाही.

अॅपलची ही वॉच फेस आणि मेमोजी फेस सोबत येते. नवीन वॉच ऑलवेज ऑन डिस्प्ले आधीच्या तुलनेत जास्त ब्राईट आहे. या वॉचची सुरुवातीची किंमत ३९९ डॉलर म्हणजेच २९ हजार ३६८ रुपये आहे.

अॅपल वॉच SE सुद्धा लाँच
कंपनीने आपली स्वस्त वॉच सीरीज अॅपल वॉच SE सुद्धा लाँच केली आहे. अॅपल वॉच सीरीज ३ खूप प्रसिद्ध होत आहे. नवीन अॅपल SE याचे अपग्रेड आहे. अॅपल वॉच ३ मध्ये अनेक बिल्ट इन जीपीएस यासारखे अनेक जबरदस्त फीचर्स आहेत. अॅपल वॉच SE मध्ये एस५ चिपचा वापर केला आहे. याअंतर्गत अॅपल वॉच ३ पट अधिक चांगला परफॉरमन्स देवू शकते. या वॉचची किंमत कंपनीने २७९ डॉलर ठेवली आहे. तर अॅपल वॉच ३ मार्केटमध्ये १९९ डॉलर म्हणजेच १४ हजार ६४८ रुपयांत उपलब्ध आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button