ताज्या घडामोडीपुणे

म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणात आणखी एकाला बेड्या, पुणे सायबर पोलिसांची कारवाई

पुणे | म्हाडा भरती परीक्षा दरम्यान पेपरफुटी प्रकरणाचा पुणे सायबर पालिसांनी पर्दाफाश केला आहे. काही दिवसांपूर्वी जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नाॅलाॅजी प्रा. लि. कंपनीचा संचालक डाॅ. प्रितिश देशमुख याच्यासह अंकुश हरकळ, संतोष हरकळ या एजंट बंधूंना अटक केली होती.

याप्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास करत एजंट काचंन श्रीमंत साळवे (वय-३१,रा.नागसेन नगर, धानोरा रोड, बीड) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत दहा आरोपींना अटक केली असून कांचन साळवे हा 11वा आरोपी आहे. साळवेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

जी. ए. सॉफ्टवेअरचा डॉ. प्रीतिश देशमुख याने म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी जवळपास दहा एजंटांशी संपर्क केला होता. त्यांच्यामार्फत पेपर फोडण्याचा त्याचा कट असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या एजंटांनी परीक्षार्थींशी संपर्क साधून त्यांना पेपर कोरा सोडण्यास सांगण्यात येणार होते. त्यानंतर ओएमआरशीटमध्ये देशमुख फेरफार करून परीक्षार्थींना पास करणार होता. मात्र, पोलिसांनी त्यांचा हा कट हाणून पाडला. पोलिसांकडून त्यांचे ४ पेन ड्राईव्ह, टॅब, मोबाइल जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात आता कांचन साळवे या 11व्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button