breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

संतापजनक! रणरणत्या उन्हात गरोदर महिलेला ३ किमी अंतर चालण्यास भाग पाडणारी महिला पोलीस अधिकारी निलंबित

ओडिशा |

ओडिशामधील मयुरभांज जिल्ह्यातील एका महिला पोलीस निरिक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. एका गरोदर महिलेला रणरणत्या उन्हात तीन किलोमीटरपर्यंत चालण्यास भाग पाडल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे केवळ हेल्मेट घालतं नाही म्हणून या महिलेला एवढी कठोर शिक्षा या पोलीस अधिकाऱ्याने दिल्याची माहितीसमोर आली आहे. बिक्रम बिरुली हे आपल्या आठ महिन्याच्या गरोदर पत्नीला तपासणीसाठी घेऊन जात असतानाच सारत पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये पोलिसांनी या जोडप्याला अडवलं. बिक्रम हे गाडी चालवत असल्याने त्यांनी हेल्मेट घातलं होतं. मात्र त्यांच्य मागे बसलेल्या त्यांच्या पत्नी गुरुबारी बिरुली यांनी हेल्मेट घातलं नव्हतं. पोलिसांनी या प्रकरणामध्ये बिरुली दांपत्याला दंड ठोठावला.

मात्र बिक्रम यांच्याकडे दंड देण्याइतके पैसे नव्हते. मी ऑनलाइन माध्यमातून दंड भरतो असं बिक्रम यांनी सांगितलं. मात्र त्यानंतरही पोलिसांनी त्यांना सोडण्यास नकार दिला. त्यानंतर सातर पोलीस स्थानकातील पोलीस निरिक्षक रिना बक्सला आणि बिक्रम यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर बिक्रम यांना पोलिसांच्या गाडीतून पोलीस स्थानकात घेऊन जाण्यात आलं. मात्र बिक्रम यांना घेऊन जाताना रिना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आठ महिन्याच्या गरोदर असणारा गुरुबारी यांना नेलं नाही आणि कोणीही सोबत नसताना निर्जनस्थळी त्यांना एकटं सोडून पोलीस बिक्रम यांना घेऊन निघून गेले. “मी त्या महिला पोलीस निरिक्षकाकडे मलाही माझ्या पतीसोबत घेऊन जा अशी विनंती केली. मात्र त्यांनी नकार दिला,” असं गुरुबारी यांनी म्हटलं आहे. त्यानंतर गुरुबाली तीन किलोमीटरवर असणाऱ्या पोलीस स्थानकावर भर उन्हामध्ये चालत गेल्या. त्यानंतरही या दोघांना पोलिसांनी तिथे दोन तास वाट पहायला लावली. या प्रकरणामध्ये मयुरभांजचे पोलीस अधीक्षक स्मित परमार यांनी रिना बक्सला यांना निलंबित केलं आहे.

वाचा- “सचिन वाझेंनी असा काय खुलासा केला की, शरद पवारांच्या अचानक पोटात दुखायला लागलं?”- भाजपा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button