TOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमुंबई

टी20 वर्ल्ड कपनंतर मोठा उलटफेर, क्रिकेट बोर्डाची कारवाई

मुंबई : टी20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा पराभूत करत नाव कोरले आहे. या पराभवानंतर पाकिस्तानची नाच्चकी झाली आहे. त्यात आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर आता अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहे. अनेक संघातील खेळाडू निवृत्ती घेतील, तर अनेकांना कर्णधार पद सोडावे लागणार आहे. असे अनेक बदल प्रत्येक संघात पाहायला मिळणार आहे. त्यात आता टी20 वर्ल्ड कपमधील पराभवानंतर आता पाकिस्तान बोर्डाने मोठी कारवाई केली आहे. 
  
टी20 वर्ल्ड कपमध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा अंतिम फेरीत दारुण पराभव झाला. इंग्लंडने 5 विकेट्स राखत पाकिस्तानचा पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी मोठी कारवाई केली आहे.

नोटीसा पाठवल्या 

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अॅक्शन मोड़मध्ये आले आहे. बोर्डाने बाबर आझमचा चुलत भाऊ कामरान अकमलचा कायदेशीर नोटीस पाठवली आहे. अकमलने यूट्यूब चॅनलवर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाच्या T20 विश्वचषकातील कामगिरीवर अपमानास्पद, खोटी आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा दावा नोटिशीत करण्यात आला आहे.

दरम्यान कामरान अकमलच नाही तर शोएब अख्तर, वसीम अक्रम, वकार युनूस यांसारख्या दिग्गजांसह पाकिस्तानच्या अनेक माजी क्रिकेटपटूंना नोटीस बजावण्यात आल्याचे एका मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. या माजी क्रिकेटर्सनी टीव्ही चॅनेल, यूट्यूब आणि वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टी-20 वर्ल्ड कपमधील कामगिरीबद्दल पाकिस्तान संघावर जोरदार टीका केली होती. 

दरम्यान झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू कामरान अकमलने बाबर आझमला (Babar Azam) पाकिस्तान संघाचे कर्णधारपद सोडण्याचा सल्लाही दिला होता. सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, “कामरानवर कोणते आरोप केले आहेत हे मला माहीत नाही पण कायदेशीर नोटीस पाठवली आहे.” पीसीबी अध्यक्षांचे असेही मत आहे की, कामरानने मीडियामध्ये त्याच्याबद्दल अपमानास्पद, खोट्या आणि आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button