breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी निवडणुकांची घोषणा, २६ जूनला होणार मतदान

मुंबई | राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता, या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये, २ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे.

मुंबई पदवीधर मतदार संघातून विलास पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत ७ जुलै रोजी संपत आहे. तसेच, मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपत आहे. त्यामुळे, येथील ४ जागांसाठी निवडणूक आयोगाकडून विधानपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचा    –      ‘निकालाची चिंता न करता राज्यातील पाणी प्रश्नाकडे लक्ष द्यावे’; अनिल देशमुखांची सरकारवर टीका 

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम :

३१ मे ७ जून पर्यंत अर्ज भरणार

१० जून रोजी अर्जाची छाननी होणार

१२ जूनपर्यंत अर्ज माघारी घेता येणार

२६ जून रोजी मतदान होणार

१ जुलै रोजी होणार मतमोजणी होणार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button