breaking-newsराष्ट्रिय

कैरानामध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला, विरोधक-भाजप आमने-सामने

लखनऊ : कैराना लोकसभा मतदारसंघात आज सोमवारी पोटनिवडणूक होत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते हुकूमसिंह यांच्या निधनाने येथे पोटनिवडणूक होत आहे. भाजपने हुकूमसिंह यांची मुलगी मृगांका सिंह यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रीय लोकदलाकडून तबस्सूम हसन या रिंगणात आहेत. त्यांना समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष व काँग्रेसचा पाठिंबा दिला आहे.

१७ लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात मुस्लीम, जाट व दलितांचे प्रमाण मोठ्या संख्येने आहे. गोरखपूर व फुलपूरमध्ये विरोधकांच्या संयुक्त उमेदवारांनी भाजपचा पराभव केला होता. भाजपने ही जागा राखण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था तसेच ऊस उत्पादकांच्या समस्या हे दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत. कैरानाबरोबरच उत्तर प्रदेशातील नुरपूर विधानसभा मतदारसंघात आजच मतदान आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button